रत्नागिरी शहर भाजपच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम
रत्नागिरी बातमी अनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजप शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे व कार्यक्रमाचे संयोजक अजिंक्य केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले. समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला रत्नागिरीतील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
५६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्ताची गरज लक्षात घेऊन आणि समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करण्याचा हा अनोखा प्रयत्न शहर भाजपकडून करण्यात आला.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. समाजहिताच्या अशा विविध उपक्रमांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करणे हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना आहे,” असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या प्रसंगी भाजप शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, निलेश आखाडे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, उपाध्यक्ष राजू भाटलेकर, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, महिला मोर्चा शहराध्यक्षा भक्ती दळी, नगरसेवक नितीन जाधव, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, राजू तोडणकर, मंदार भोळे, मंदार खंडकर, डॉ. ऋषी केळकर, मनोज पाटणकर, सोनाली केसरकर, संदीप रसाळ, अशोक वाडेकर, पुंडलिक पावसकर, संकेत कदम, शोनाली आंबेरकर, प्रज्ञा टाकळे, शैलेश बेर्डे, मुक्ता बाष्टे, प्रसाद बाष्टे, नुपूरा मुळ्ये, प्रशांत घाणेकर, सायली बेर्डे, विजया भाटकर, अद्वैत कुळकर्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक रक्तदात्यांच्या सहकार्यामुळे हे रक्तदान शिबिर अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 25-07-2026














