पत्नीसोबत झालेल्या वादातून उचलले टोकाचे पाऊल?
रत्नागिरी:
धामणसे चौकेवाडीत तरुणाची आत्महत्या झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना शनिवारी, २५ जुलै रोजी दुपारी २.३० ते २.४५ वाजेच्या सुमारास समोर आली.
घरगुती वादातून टोकाचा निर्णय
नितीन नारायण कळंबटे (वय २४, रा. धामणसे चौकेवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नितीनचा त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या मानसिक तणावातूनच त्याने राहत्या घरातील खोलीत असलेल्या लाकडी वाशाला नायलॉनच्या साडीने गळफास लावून घेतला.
पोलिसांकडून पंचनामा आणि तपास सुरू
सदर प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ यासंदर्भात रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पुढील उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमन) जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:12 27-07-2026














