जगबुडीसह नारंगी नदीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
खेड:
Jagbudi River Water Level मध्ये खेड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे मोठी वाढ झाली असून जगबुडी नदीने सोमवारी दुपारी पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली आहे. सायंकाळी ४ वाजता भरणे नाका पुलाजवळ जगबुडी नदीची पाणी पातळी ५.२० मीटर इतकी नोंदवण्यात आली असून, या ठिकाणी इशारा पातळी ५ मीटर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने खेड तालुक्यातील विविध धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
- नातुवाडी मध्यम प्रकल्प: नातुवाडी मध्यम प्रकल्पात ८७.६९ मीटर पाणीपातळी नोंदवली गेली आहे. यात उपयुक्त पाणीसाठा ११८.३७७ दलघमी (६७.४९ टक्के) झाला असून, प्रकल्पातून ५.११९ घनमीटर प्रति सेकंद वेगाने सांडवा विसर्ग सुरू आहे.
- पिंपळवाडी लघु प्रकल्प: पिंपळवाडी प्रकल्पात १२५.९१ मीटर पाणीपातळी असून १७.९४८ दलघमी (६७.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा नोंदवला गेला आहे. या धरणातून २८.४० घनमीटर प्रति सेकंद सांडवा विसर्ग आणि १.७९ घनमीटर प्रति सेकंद विमोचक विसर्ग सुरू आहे.
- शिरवली लघु प्रकल्प: शिरवली लघु प्रकल्प १०० टक्के भरला असून, त्यात २.९७८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणातून २.९६६ घनमीटर प्रति सेकंद सांडवा विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Jagbudi River Water Level: उपनद्यांच्या पातळीत वाढ, प्रशासनाचे आवाहन
सतत पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी, नारंगी तसेच त्यांच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी पूर्णपणे सतर्क राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन खेड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 28-07-2026














