सुदैवाने चालक व सहकारी सुखरूप; मोठा अनर्थ टळला
खेड :
Tempo Accident Near Khed बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंडे गावाजवळ रविवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास भाजी वाहतूक करणारा एक टेम्पो सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालक आणि त्याच्यासोबत प्रवास करणारा सहकारी सुदैवाने सुखरूप बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे.
कराडहून दापोलीकडे भाजी घेऊन जाताना अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, सदर टेम्पो कराड येथून दापोलीच्या दिशेने भाजीपाला घेऊन चालला होता. रविवारी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे गावाजवळ पोहोचला असता, चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेला टेम्पो महामार्गालगत असलेल्या सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत जाऊन थेट कोसळला.
Tempo Accident Near Khed: दरीतून टेम्पो बाहेर काढण्याचे काम पूर्ण
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. दरीत कोसळलेला हा टेम्पो बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साह्याने बचावकार्य राबवण्यात आले. भीषण अपघात होऊनही सुदैवाने चालक आणि सहकारी सुरक्षित राहिल्याने सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 28-07-2026














