Pali DJ Samant College Skill Workshop: पाली डी. जे. सामंत महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात

रत्नागिरी कौशल्य विकास केंद्राचा पुढाकार; विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन

रत्नागिरी :

Pali DJ Samant College Skill Workshop अंतर्गत पाली येथील डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयातील अंतरवासिता कक्षाच्या (Internship Cell) वतीने रत्नागिरी कौशल्य विकास केंद्राच्या विविध कौशल्यपूर्ण प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर आधारित मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात पार पडली.

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींवर सविस्तर मार्गदर्शन

या कार्यशाळेत रत्नागिरी कौशल्य विकास केंद्राचे मार्गदर्शक अमेय मुळ्ये व विकी पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध कौशल्याधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम, त्यांचे स्वरूप, प्रवेश प्रक्रिया आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींची सविस्तर माहिती दिली.

त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कौशल्य विकास योजना आणि हे कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. बदलत्या रोजगार क्षेत्रात केवळ पदवीबरोबरच कौशल्याधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढले असून, अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत मोठी भर पडते, असे प्रतिपादन मार्गदर्शकांनी केले.

Pali DJ Samant College Skill Workshop: कौशल्याधारित शिक्षण ही काळाची गरज – प्राचार्या डॉ. कांता कांबळे

विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता कांबळे म्हणाल्या की, “आजच्या स्पर्धात्मक युगात पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक कौशल्ये प्राप्त व्हावीत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शिक्षण पूर्ण होताच रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे.”

उपक्रमाचे नियोजन व उपस्थिती

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अंतरवासिता कक्षाच्या समन्वयक प्रा. प्रज्ञा तांबे यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 28-07-2026