गावागावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची दयनीय अवस्था; शाळा टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांच्या प्रयत्नांची गरज
Ratnagiri News: संगमेश्वर तालुक्यामध्ये १ ते ५ एवढीच अत्यंत कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल ६५ शाळा असल्याचे पटमोणीतून समोर आले आहे. आगामी काळात या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढली नाही, तर त्या पुन्हा ‘शून्य पटावर’ येऊन बंद पडण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या शाळा सुरू ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, पालक आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ठोस प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे.
तालुक्यामध्ये सन २००९ मध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ४४० शाळा कार्यरत होत्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या अभावामुळे शाळा बंद होत-होत ही संख्या आता ३२१ वर येऊन पोहोचली आहे. यावर्षीही शून्य पटसंख्येमुळे २ शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची विद्यार्थी संख्येअभावी दयनीय अवस्था झाली आहे. यावर्षीच्या पटमोणीनुसार, तालुक्यात १ ते ५ पटसंख्या असलेल्या ६५ शाळा आहेत.
तालुक्यांतील शाळांची पटसंख्यानिहाय माहिती:
- १ विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा: ताम्हाणे शाळा, कुंभारखणी खुर्द बौद्धवाडी, साखर्पा खांदवाडी, चाफवली भटाचा कोंड आणि पिरंदवणे घेवडेवाडी या शाळांचा यात समावेश आहे.
- २ विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा (१५ शाळा): कुडवली नवेलेवाडी, निवेखुर्द नंबर एक, काटवली ढोसलवाडी, कळंबस्ते नंबर एक, तुरळ डोंगवाडी, कडवई नंबर तीन, कळंबुशी नंबर दोन, साखर्पा गुरववाडी, दखखीण धनगरवाडी, वांझोले बुद्रुक सनगलेवाडी, तुळसणी कातकरवाडी, वाशी मावळतवाडी, कर्ली नंबर दोन रावणगवाडी आणि परचुरी नंबर एक.
- ३ विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा: शिवणे नंबर दोन, मुचरी गौळवाडी, हातीव नंबर दोन, बेलारी बुद्रुक नंबर एक, काटवली धनगरवाडी, कोंडओझरे, वाशी भोवरेचीवाडी, किंजळे वाशी टाक्याची वाडी, उमरे बाईतवाडी, मुरुडेश्वर नंबर तीन, कोंडीवरे मराठी शाळा, मुर्शी गाडेवाडी, दामोळे धनगरवाडी, प्रिंदवणे नंबर एक आणि फणगुस कातळवाडी.
- ४ विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा (१३ शाळा): करंबळेवाडी, मठ धामापूर शाळा, नायरी मोहल्ला, तुरळ मराठवाडी, शिंदे आंबेरी, कडवई तलेकरवाडी, धामापूर तर्फे संगमेश्वर नंबर दोन शाळा, किरबेट सुतारवाडी, निवधे नंबर १, आंगवली रेवाळेवाडी, दामोळे सुकमवाडी नंबर तीन, देवघर आणि कोंड्ये नंबर चार.
- ५ विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा: देवरूख पठारवाडी शाळा, मुरादपूर शाळा, कुळेवाडी शाळा, असुर्डे नंबर दोन शाळा, वाडावेसवाड, नायरी मराठी शाळा, चिखली पाचकुडवेवाडी, रांगव शाळा, कडवई माधगोवाची, कनकाडी गराटवाडी, कळंबुशी नंबर ३, कोंडगाव वाणीवाडी, भडकंबा पाष्टेवाडी, चाफवली बौद्धवाडी, कोंड कदमराव आणि कडवई उर्दू शाळा.
ग्रामीण भागात कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या सातत्याने वाढत आहे. या शाळा सुरू ठेवण्यासाठी आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर चळवळ उभी राहणे काळाची गरज आहे. अन्यथा, या शाळा आणि त्यांच्या इमारती केवळ आठवणीतच उरतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 28-07-2026














