वैशिष्ट्यपूर्ण योजना व रस्ता अनुदान निधीतून विकासकामे; उद्यानांचे सुशोभीकरण आणि खुली व्यायामशाळाही होणार विकसित
रत्नागिरी : Ratnagiri Underground Gutters Sanction संदर्भात रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. रत्नागिरी शहराचे सौंदर्य खुलवण्यासाठी मंगळवारी पार पडलेल्या या सभेत, ज्या भागात अद्याप गटार व्यवस्था उपलब्ध नाही, तिथे नवीन भूमिगत गटारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात तब्बल २६ ठिकाणी ही भूमिगत गटारे उभारली जाणार असून त्यासाठी रु. ३ कोटी ८० लाख ७० हजार खर्चाच्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.
या २६ प्रभागांमध्ये/ठिकाणी होणार भूमिगत गटारांची कामे
रस्ता अनुदान योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून खालील प्रमुख ठिकाणी नवीन भूमिगत गटारे बांधली जाणार आहेत:
- तेली आळी नाका, मारुती आळी, शनिवार आठवडा बाजार ते पाटीलवाडी
- राम आळी ते हनुमान फुड कॉर्नर, भुवड आळी, पोलीस वसाहत, आलीम वाडी, फगरवठार
- लिमये उद्यानाजवळ, दामले विद्यालयाजवळ, भुते नाका, पेजेवाडी, मांडवकर वाडी
- झाडगाव लघुउद्योग वसाहत, खडपे वठार आणि गोडी बाव परिसर
याशिवाय मारुती आळी ते पटवर्धन हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
उद्यानांचे सुशोभीकरण, एलईडी दिवे अन् खुली व्यायामशाळा
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्राप्त झालेल्या ७९ लाख ७३ हजार रुपयांच्या निधीतून शहरातील उद्यानांचा कायापालट केला जाणार आहे:
- स्टेट बैंक कॉलनी उद्यान: एलईडी लाईटचे खांब बसवले जातील.
- मुरलीधर मंदिर उद्यान: सोलर लाईट आणि पथदीप बसवण्यात येणार आहेत.
- प्रमोद महाजन क्रीडा संकुल (आठवडा बाजार): खुली व्यायामशाळा (ओपन जिम) विकसित केली जाईल.
- जोशी पाळंद: येथील उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे.
- पाणी पुरवठा कामे: शनिवार आठवडा बाजार येथील पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी आवश्यक सुधारणा व पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.
नेत्यांचे आभार व अभिनंदन ठराव
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ७९ लाख ७३ हजार रुपये आणि रस्ता अनुदान योजनेअंतर्गत ३ कोटी ८० लाख २७ हजार रुपयांचा निधी रत्नागिरी नगर परिषदेला उपलब्ध झाला आहे. हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठरावही सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 29-07-2026














