Ratnagiri Youth Festival 2026: रत्नागिरीत उद्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन; ‘नशामुक्त युवा’ संकल्पनेवर भर

केंद्र सरकारच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत आयोजन; तरुणांना महोत्सवात सहभागी होण्याचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : Ratnagiri Youth Festival 2026 अंतर्गत भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या ‘माय भारत’ रत्नागिरीच्या वतीने जिल्ह्यातील तरुणांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व त्यांना राष्ट्रनिर्माणाशी जोडण्यासाठी ३१ जुलै २०२६ रोजी एका विशेष जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या देशव्यापी मोहिमेचा भाग व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या मुख्य संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्त आणि प्रगत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांची ऊर्जा, उत्साह आणि सर्जनशीलता एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यावर या महोत्सवाचा प्रामुख्याने भर असणार आहे.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ‘mybharat.gov.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Nasha Mukt Bharat’ या इव्हेंट्स सेक्शन अंतर्गत सविस्तर माहिती मिळवून आपली नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:41 30-07-2026