महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; महाराजस्व अभियान आणि आढावा बैठकीचे आयोजन

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर नागरिकांची निवेदने स्वीकारणार; जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठक

रत्नागिरी: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत महाराजास्व अभियान तसेच विविध विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडणार आहे. त्यांच्या या अधिकृत दौऱ्याची सविस्तर माहिती आणि वेळपत्रक पुढीलप्रमाणे आहे:

  • सकाळी १०.०० वाजता: ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान’ कार्यक्रमाला उपस्थिती आणि स्थानिक नागरिकांची निवेदने स्वीकारणे (स्थळ: गोगटे-जोगळेकर महाविद्यालय मैदान, रत्नागिरी).
  • दुपारी १२.०० वाजता: राखीव वेळ (रघुनाथ पांडे).
  • दुपारी १२.३० वाजता: राखीव वेळ (स्थळ: स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी).
  • दुपारी १.३० वाजता: रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तसेच भूमि अभिलेख विभागाची आढावा बैठक (स्थळ: जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय).
  • दुपारी ३.३० वाजता: राखीव वेळ.

या दौऱ्याच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर चर्चा होण्यासोबतच स्थानिक नागरिकांच्या अडचणी थेट महसूल मंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 01-08-2026