Ratnagiri Municipal Council Worker: सर्पदंशाने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; भाजपकडून ₹५ लाखांची तातडीची मदत

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी घेतली कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट; शैक्षणिक पाठबळाचे आश्वासन

रत्नागिरी: Ratnagiri Municipal Council Worker म्हणून उद्यान विभागात कार्यरत असलेले काशीनाथ गोताड (वय निवासी फगर वठार) यांचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाजवळ काम करत असताना सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. माडाच्या झापांची साफसफाई करत असताना त्यांना सर्पदंश झाला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Ratnagiri Municipal Council Worker च्या कुटुंबाला भाजपची ५ लाखांची आर्थिक मदत

या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे आणि भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. या घटनेची तात्काळ दखल घेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गोताड कुटुंबाला सर्वतोपरी साहाय्य करण्याच्या सूचना दिल्यानंतर पक्षाच्या वतीने ५ लाखांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली.

दिवंगत काशीनाथ गोताड यांच्या घरी भेट देऊन सौ. वर्षा ढेकणे यांनी त्यांच्या पत्नीचे सांत्वन केले आणि या कठीण प्रसंगी भारतीय जनता पार्टी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात पाल्यांच्या कोणत्याही शैक्षणिक गरजेसाठी पक्षाच्या वतीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक नितीन जाधव, राजू तोडणकर, मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ, भाजप जिल्हा सरचिटणीस नुपूर मुळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी संदीप सुर्वे, शमी हरचेकर, शोभा जिरोळे, राकेश सुवरे, संदीप रसाळ, सचिन करमरकर आणि संतोष सावंत उपस्थित होते. उपस्थितांनी संकटसमयी सामाजिक बांधिलकी जपत गोताड कुटुंबाला कायम धीर देण्याचा विश्वास व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 01-08-2026