Chiplun Ganja Seized Under Mission Phoenix: चिपळूणमध्ये ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत धाड; ५३० ग्रॅम गांजासह संशयिताला अटक

वालोपे रेल्वे स्थानक परिसरात चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई

बातमी:

रत्नागिरी/चिपळूण: Chiplun Ganja Seized Under Mission Phoenix या जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. चिपळूण शहरातील वालोपे येथील रेल्वे स्थानकासमोरील साई मंदिरा शेजारी शुक्रवारी, ३१ जुलै रोजी धाड टाकून ५३० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Chiplun Ganja Seized Under Mission Phoenix अंतर्गत ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक गस्तीवर होते. यादरम्यान वालोपे परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्याच्या पांढऱ्या कापडी पिशवीची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान ३० हजार रुपये किमतीचा ५३० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश पदार्थ आढळून आला. याप्रकरणी अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय ४८, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२३/२०२६, एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, वृषाल शेटकर, रोशन पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वनगे आणि रुपेश जोगी (१३१५) यांच्या पथकाने पार पाडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 01-08-2026