वाहनचालकांचे हाल; निकृष्ट दर्जाचे काम आणि खड्ड्यांविरोधात ४-५ दिवसांत कारवाईचा इशारा
चिपळूण: Mundhe Kumbharli Ghat Potholes मुळे प्रवाशांना तीव्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुंढे ते कुंभार्ली घाटमाथा दरम्यान मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर मुल्ला यांच्याकडे भरत लब्धे यांनी निवेदनाद्वारे तातडीने दुरुस्ती करण्याची आक्रमक मागणी केली आहे.
Mundhe Kumbharli Ghat Potholes मुळे पोफळी परिसरात रस्त्याची बिकट अवस्था
भरत लब्धे यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुंढे ते कुंभार्ली घाटमाथ्यापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. विशेषतः पोफळी परिसरात यापूर्वी एका ठेकेदार कंपनीने केलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अल्पावधीतच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या दुरावस्थेबाबतचा व्हिडिओदेखील राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या वाईट स्थितीबाबत नागरिक आणि वाहनचालकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणत्याही परिस्थितीत येत्या चार ते पाच दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच खड्डे बुजवताना जांभ्या दगडाचा अथवा निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर अजिबात करू नये; दर्जेदार साहित्य वापरून कायमस्वरूपी आणि टिकाऊ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही लब्धे यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 01-08-2026














