गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात: ज्येष्ठ रंगकर्मी अन् पत्रकारांकडून कौतुक

कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांना मान्यवरांची पसंती; विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी:

रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे. आजपर्यंत या महाविद्यालयातून अनेक दिग्गज कलाकार निर्माण झाले असून, ते आज मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत राहून रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करत आहेत. याच परंपरेला पुढे नेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयात ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ ही स्वतंत्र शाखा सुरू करण्यात आली. सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील कला समृद्ध करण्यासोबतच त्यांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी या शाखेतर्फे विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी आणि पत्रकारांची उपस्थिती

परफॉर्मिंग आर्ट्स शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीतील अनेक ज्येष्ठ रंगकर्मी, पत्रकार आणि मान्यवरांनी शाखेला प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली व कौतुक केले. यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर जोशी, अनुया बाम, सोनाली सावंत, विजय पोकळे, युवा रंगकर्मी दीपक माणगावकर आणि अजिंक्य केसरकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.

या प्रसंगी ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू, पत्रकार दुर्गेश आखाडे, अमोल खापरे, ‘लोकसत्ता’चे श्री. चव्हाण, व्यावसायिक श्री. व सौ. सायली खेडेकर यांनीही उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री. नंदकिशोर गोळपकर, माजी सहकारी बापू गवाणकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विनोद शिंदे, लीना सावंत, राजेश मालप, डॉ. यास्मिन आवटे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम आणि समन्वयक डॉ. मीनल खांडके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संस्थेचे पदाधिकारी आणि प्राध्यापक वर्गाकडून शुभेच्छा

या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, समन्वयक डॉ. मीनल खांडके, विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्गाने परफॉर्मिंग आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:43 03-08-2026