Rajapur Woman Suicide News: डोकेदुखीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

बुरंबेवाडी येथील घटना; नाटे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Rajapur Woman Suicide News संदर्भात राजापूर तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सततच्या डोकेदुखीच्या आजाराला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती संदीप गुरव (वय ३२, रा. उपळे गुरववाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. आरती गुरव या गेल्या काही दिवसांपासून तीव्र डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त होत्या. २ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बुरंबेवाडी येथील घराच्या वरच्या मजल्यावर त्यांनी ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतला.

घटना निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी या संदर्भात तात्काळ पोलिसांना माहिती दिली. नाटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 04-08-2026