अनधिकृत ॲप्स आणि WhatsApp लिंक्सद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश
सायबर गुन्हेगारांकडून गॅस बुकिंगच्या नावाने बनावट मोबाईल ॲप्स (Fake Apps) तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दल आणि पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची जनजागृती सूचना जारी करण्यात आली आहे.
ऑनलाइन सायबर फसवणुकीपासून बचावासाठी ‘५’ सुवर्णनियम
अधिकृत स्रोत वापरा: गॅस सिलिंडर बुकिंग किंवा इतर सेवांसाठी केवळ अधिकृत Gas कंपनीचेच App किंवा वेबसाईट वापरा.
अनामिक लिंकवरून ॲप डाउनलोड करू नका: कोणत्याही अनधिकृत APK File किंवा WhatsApp वर आलेल्या अस्पष्ट लिंकवरून ॲप्स डाऊनलोड करू नका.
गोपनीय माहिती शेअर करू नका: तुमचा OTP, UPI PIN, बँक कार्डचा CVV किंवा बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका.
ॲपचे रिव्ह्यू आणि पब्लिशर तपासा: कोणतेही App Install करण्यापूर्वी त्याचा Publisher आणि इतर युझर्सचे Reviews नक्की तपासा.
संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका: अनोळखी किंवा संशयास्पद मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करणे टाळा.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल?
तुमची किंवा तुमच्या परिचित व्यक्तीची सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधा:
हेल्पलाइन क्रमांक: call १९३० (1930) वर त्वरित संपर्क साधा.
अधिकृत पोर्टल: www.cybercrime.gov.in वर तुमची तक्रार नोंदवा.
सुरक्षिततेचा मंत्र: “विचार करा मग क्लिक करा. तुमची माहिती, तुमची जबाबदारी – सुरक्षित व्यवहार डिजिटल स्वीकार.”














