शेतात काम करताना घडली घटना; खेड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
खेड: खेड तालुक्यातील कुटरे येथील एका ६० वर्षीय वृद्धाचा सर्पदंशाने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्देवी घटनेप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बाबुराव शिर्के (वय ६०, रा. कुटरे खालची पेठ, ता. खेड) हे २ ऑगस्ट रोजी शेतात काम करत असताना त्यांच्या पायाला विषारी सर्पाने दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, खेड येथे हलवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेबाबत खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 05-08-2026














