घाणेखुंट-गवळीवाडी येथील घटना; ५५ वर्षीय व्यक्तीविरोधात खेड पोलिसांची कारवाई
खेड: खेड तालुक्यातील घाणेखुंट-गवळीवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यपान करणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तीवर खेड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ही कारवाई ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यपान
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गोविंद तांबे (वय ५५, रा. खालची बौद्धवाडी, कोतवली, ता. खेड) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याचा परवाना नसतानाही संबंधित व्यक्ती दारू पिताना आढळल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सार्वजनिक ठिकाणी अवैध रीतीने दारू पिऊन हुल्लडबाजी किंवा उपद्रव घडू नये, यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुहास हिंदुराव पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 05-08-2026














