Iqbal Tole Unopposed Deputy Sarpanch: वेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इक्बाल टोळे यांची बिनविरोध निवड

माजी उपसरपंच श्रावणी जाधव यांच्या राजीनाम्यानंतर निर्णय

लांजा / रत्नागिरी: लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी इक्बाल टोळे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच श्रावणी जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने इक्बाल टोळे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर इक्बाल टोळे यांचे ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. वेरळ गावाच्या विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी टोळे यांनी स्पष्ट केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

निवडीची अधिकृत घोषणा होताच उपसरपंच इक्बाल टोळे यांना शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, पंचायत समिती सदस्या सौ. दिपाली साळवी, ज्येष्ठ पदाधिकारी शरद चरकरी, वेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा जाधव, साईजिन टोले, महेश गुंड्ये, अनघा पाष्टे, श्रीमती पानकर, माजी सरपंच सुप्रिया चव्हाण, मंगेश डाकवे, तसेच बशीर वनू, नुरा टोले आणि नईम टोले या प्रमुख मान्यवरांचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 22-08-2026