Pali Bike Theft: पाली-घडशीवाडीत घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून अज्ञाताविरोधात तपास सुरू

रत्नागिरी:

तालुक्यातील पाली-घडशीवाडी येथे घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर दुचाकी अज्ञाताने लांबविल्याची घटना समोर आली आहे. ही चोरी १९ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० ते सकाळी ६.३० या कालावधीत घडली. याबाबत सचिन शिवाजी गोंधळी (वय २६, रा. पाली घडशीवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळी दुचाकी गायब असल्याचे आले लक्षात

पोलीस तक्रारीनुसार, सचिन गोंधळी यांनी बुधवारी रात्री आपली स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक MH-08-AV-4292) नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केली होती. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता ते घराबाहेर आले असता त्यांना दुचाकी मूळ जागी दिसून आली नाही.

Shanti real estate 1

त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरात दुचाकीचा शोध घेतला; मात्र दुचाकी कोठेही मिळून आली नाही. दुचाकी चोरीला गेल्याची खात्री पटताच गोंधळी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 22-08-2026