गोकुळ अष्टमीनिमित्त रत्नागिरीत ‘निमंत्रित भव्य भजन स्पर्धा २०२६’ चे आयोजन

श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या गोकुळ अष्टमी उत्सवा निमित्त मंगळवारी रंगणार सुरेल मैफल; रोख पारितोषिके व आकर्षक ट्रॉफी

रत्नागिरी : गोकुळ अष्टमी उत्सवाचे औचित्य साधून श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने ‘निमंत्रित भव्य भजन स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता श्री राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.

रोख पारितोषिके आणि आकर्षक सन्मानचिन्हे

भजन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना तसेच वैयक्तिक कलाकारांना भरघोस रोख बक्षिसे आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे:

सांघिक पारितोषिके:

Tata motars tiago

  • प्रथम क्रमांक: ₹ ७,१०१/- व आकर्षक ट्रॉफी
  • द्वितीय क्रमांक: ₹ ५,१०१/- व आकर्षक ट्रॉफी
  • तृतीय क्रमांक: ₹ ३,१०१/- व आकर्षक ट्रॉफी

वैयक्तिक विशेष पारितोषिके:

  • उत्कृष्ट पखवाज: ₹ १,१०१/- व आकर्षक ट्रॉफी
  • उत्कृष्ट गायक: ₹ १,१०१/- व आकर्षक ट्रॉफी
  • उत्कृष्ट कोरस: ₹ १,१०१/- व आकर्षक ट्रॉफी

भक्तीमय वातावरणात रंगणार स्पर्धा

या स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील भजन परंपरेला आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. राजन शामकांत मलुष्टे यांनी सर्व भाविक, संगीतप्रेमी आणि नागरिकांना या भक्तीमय भजन स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.