रत्नागिरी: गोखले नाका येथे तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला; उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू

शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी शहरात बेशुद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोखले नाक्यावरील दीपक स्टोअर्सच्या बाजूला रविवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीचा उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. सुनील महादेव डिंगणकर (वय ४२, रा. मधलीवाडी, भोंबार, पाचेरीसडा, भातगाव, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

स्थानिकांची मदत आणि रुग्णालयात दाखला

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुनील डिंगणकर हे गोखले नाक्याजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेले स्थानिकांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल), रत्नागिरी येथे हलवण्यात आले.

डॉक्टरांकडून मृत घोषित; पोलिसांत नोंद

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रुती बोडके यांनी २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद केली. याप्रकरणी मृताच्या पत्नी सोनाली सुनील डिंगणकर यांनी दिलेल्या खबरेवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (C.R. Person) नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 25-08-2026