Asim Sarode: लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधातील आंदोलनाला असीम सरोदे यांचा पाठिंबा

कोकण नागरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट; कंपनी तत्काळ बंद करण्यासाठी कायदेशीर आणि सामाजिक लढा उभारणार

लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि वकील ॲड. असीम सरोदे यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, कोकण नागरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने रत्नागिरी येथे ॲड. असीम सरोदे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली.

कंपनी तत्काळ बंद करण्याची मागणी आणि असीम सरोदेंचा शब्द

ही घातक कंपनी तत्काळ बंद करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी आंदोलकांनी ॲड. सरोदे यांच्याकडे कायदेशीर आणि सामाजिक लढ्यासाठी सहकार्याची विनंती केली. यावर ॲड. असीम सरोदे यांनी या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त करत, “मी स्वतः या लढ्यात सक्रिय सहभागी होईन,” असा शब्द शिष्टमंडळाला दिला. यासोबतच, प्रदूषण आणि स्थानिक आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 25-08-2026

Shanti real estate 1