Dapoli Harne Beach: हर्णे किनाऱ्याजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू

दापोली तालुक्यातील हर्णे वाकडी भेंड येथे समुद्रकिनाऱ्याजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास किनाऱ्यालगत राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांच्या ही घटना प्रथम निदर्शनास आली.

पोलीस घटनास्थळी दाखल; तपास सुरू

समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह तरंगताना/पडलेला दिसताच ग्रामस्थांनी तातडीने याची माहिती दापोली पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला असून, पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमन) रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. हा मृतदेह कोणाचा आहे आणि मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची ओळख पटवण्याचे आणि पुढील तपासाचे काम पोलिसांनी वेगाने सुरू केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:07 25-08-2026