SNDT Youth Festival 2026-27: एसएनडीटी प्रादेशिक युवा महोत्सवात महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीची दैदिप्यमान कामगिरी; नाट्य विभागाची विजेतेपदाची चषक पटकावली

विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींचे वर्चस्व; लोकनृत्य आणि एकांकिकेत मिळवला प्रथम क्रमांक

पुणे येथील के. बी. जोशी इन्स्टिट्यूट येथे आयोजित एसएनडीटी प्रादेशिक युवा महोत्सव २०२६-२७ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचलित महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरीच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत भरघोस यश संपादन केले आहे. विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाने नाट्य विभागाचे अजिंक्यपद (विजेतेपदाची चषक) पटकावले असून, महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विविध विभागांतील विजेत्यांची यादी

विद्यार्थिनींनी साहित्य, ललित कला, नाट्य आणि नृत्य या चारही विभागांमध्ये यश मिळवले:

  • साहित्य विभाग:
    • वक्तृत्व स्पर्धा: पूर्वा बुटाला (मराठी – तृतीय), सफा काझी (हिंदी – उत्तेजनार्थ).
    • वादविवाद स्पर्धा: आयेशा मुल्ला व सफा काझी (हिंदी – तृतीय), तीर्था नारवणकर व नुपूर सावंत (इंग्रजी – द्वितीय).
    • निबंध स्पर्धा: तेजस्विनी पाटील (मराठी – तृतीय), केदांती कीर (हिंदी – तृतीय).
  • ललित कला विभाग:
    • कोलाज स्पर्धा: रिया कीर (तृतीय).
    • मातीशिल्प स्पर्धा: श्रावणी आंब्रे (प्रथम), आयेशा मुल्ला (द्वितीय), सानिका कदम (तृतीय).
  • नाट्य विभाग (चॅम्पियनशिप ट्रॉफी):
    • एकांकिका स्पर्धा: प्रथम क्रमांक.
    • मूकाभिनय स्पर्धा: प्रथम क्रमांक.
    • नाटिका स्पर्धा: द्वितीय क्रमांक.
    • पथनाट्य स्पर्धा: तृतीय क्रमांक.
    • नकला स्पर्धा: सानिका कदम (उत्तेजनार्थ).
  • नृत्य विभाग:
    • लोकनृत्य स्पर्धा: प्रथम क्रमांक.

मार्गदर्शक आणि संस्थाचालकांकडून कौतुक

Happy journey english

विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रतिभा लोंढे, नाट्य विभागासाठी मयूर साळवी, श्रेयस माईन, साहिल चरकरी तसेच नृत्य दिग्दर्शक रुपेश धाडवे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्ष श्री. रवींद्र देव, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 25-08-2026