रत्नागिरी: साठरेबांबर फाट्याजवळ सार्वजनिक ठिकाणी मध्यप्राशन; प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल

दारू पिण्याचा परवाना नसताना उघड्यावर मध्यप्राशन; ग्रामीण पोलिसांची कारवाई

सार्वजनिक ठिकाणी मध्यप्राशन केल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील साठरेबांबर फाट्याजवळ एका ५३ वर्षीय प्रौढाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारी ११:५० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव समीर दत्ताराम पेडणेकर (वय ५३, रा. बांबर पेडणेकरवाडी, रत्नागिरी) असे आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी संशयित समीर पेडणेकर हा साठरेबांबर फाट्याजवळ सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना मद्यप्राशन करत असताना आढळून आला. यावेळी तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडून ही कारवाई केली.

याप्रकरणी संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन उपद्रव करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 28-08-2026