देशातील विद्यार्थ्यांना भविष्याची भीती वाटणार नाही असे वातावरण निर्माण करण्याचे कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकांचे आवाहन
IIT Delhi Student Suicide Case प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. आयआयटी दिल्लीमधील ३१ वर्षीय विद्यार्थी ऋषिकेश कुमार याच्या आत्महत्येवर दुःख व्यक्त करत त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांनी भविष्याच्या चिंतेने घाबरून जाऊ नये, यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये भीतीमुक्त आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
IIT Delhi Student Suicide Case: विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे गरजेचे
अभिजीत दीपके यांनी नमूद केले की, आयआयटीसारख्या संस्थांची गणना देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये केली जाते. मात्र, मागील वर्षभरात आयआयटी संस्थांमध्ये ६५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही अवस्था आपल्या सर्वोत्तम शिक्षण संस्थांची असून विद्यार्थ्यांना संघर्षाच्या काळात एकटे सोडले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना मानसिक पाठबळ देण्याची मागणी त्यांनी केली.
आयआयटी दिल्लीत घडलेली घटना आणि चौकशी समिती
ऋषिकेश कुमार या विद्यार्थ्याचा २२ ऑगस्ट रोजी आयआयटी दिल्लीच्या लेक्चर हॉल कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी आयआयटी दिल्ली प्रशासनाने एका विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीत दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, एम्सचे प्राध्यापक प्रताप शरण, आयआयटी दिल्लीचे कुलसचिव आणि विद्यार्थ्यांचे चार प्रतिनिधी समाविष्ट आहेत.
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुभाष चंद्रा यांच्यावर निशाणा
या वेळी बोलताना अभिजीत दीपके यांनी सुभाष चंद्रा यांच्यावरही जोरदार टीका केली. २२ हजार कोटींचे कर्ज केवळ ६ कोटी रुपये स्वीकारून माफ करण्यात आल्याच्या दाव्याचा उल्लेख करत त्यांनी सर्वसामान्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला. ५० लाखांचे गृहकर्ज असल्यास बँक ५० हजार रुपयांत माफ करते का, असा सवाल त्यांनी केला. सर्वसामान्यांना शिक्षणावरील कर्जावरही व्याजासह परतफेड करावी लागते, तर बड्या लोकांची मुद्दलही माफ केली जाते, अशी टीका करत या २२ हजार कोटींची भरपाई जनतेच्या कराच्या पैशांतूनच झाली असल्याचा दावा त्यांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 29-08-2026














