Ratnagiri Investment Conference: रत्नागिरीत उद्या जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन; नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी सामंजस्य करारांवर होणार स्वाक्षऱ्या

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सावंत पॅलेस हॉटेल येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रंगणार परिषद

Ratnagiri Investment Conference च्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन उद्योगांना चालना देण्यासाठी आणि नवीन गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत येत्या रविवारी, ३० ऑगस्ट रोजी जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सावंत पॅलेस हॉटेल (टीआरपी रोड, रत्नागिरी) येथे पार पडणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देणे आणि नवीन गुंतवणुकीचे मार्ग मोकळे करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

Ratnagiri Investment Conference: प्रमुख अधिकारी व प्रशासकीय उपस्थिती

या परिषदेचे अध्यक्षस्थान उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत भूषवणार आहेत. या कार्यक्रमाला उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, तसेच ‘मैत्री’चे विशेष आयुक्त वैभव वाघमारे यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख विभागांचे मार्गदर्शन आणि उद्योजकांना आवाहन

परिषदेदरम्यान विदेश व्यापार महासंचालनालय (DGFT), मैत्री कक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि कामगार विभाग यांसारख्या उद्योगांशी संबंधित प्रमुख संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नवउद्योजकांना व गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांनी या संधीचा लाभ घेऊन परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:00 29-08-2026