पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसाय आणि बचत गटांच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
Sindhuratna Samriddhi Yojana 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पर्यटन, शेती, मत्स्यव्यवसाय, बचत गट आणि नवकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, रत्नागिरी दक्षिणच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या विशेष दौऱ्यादरम्यान ही बैठक पार पडली असून, स्थानिक पातळीवर योजनेचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला.
Sindhuratna Samriddhi Yojana 2.0: प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या मार्गदर्शन बैठकीला भाजप जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, दक्षिण मंडल अध्यक्ष दादा दळी, उत्तर मंडल अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर मंडल अध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव ऐश्वर्या जठार, उत्तर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर आणि जिल्हा उपाध्यक्ष बावा नाचणकर यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध घटकांची माहिती आणि जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बैठकीत बोलताना डॉ. विनय नातू यांनी ‘सिंधुरत्न समृद्धी योजना २.०’ अंतर्गत समाविष्ट असलेल्या विविध विकास घटकांची माहिती उपस्थितांना दिली. यासोबतच जिल्हा नियोजन समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. या योजनांचा सखोल अभ्यास करून रत्नागिरी तालुक्यातून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले जावेत, यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संघटनात्मक बळकटीकरणावर भर
योजनांच्या मार्गदर्शनासोबतच संघटनात्मक विषयांवर चर्चा करताना डॉ. नातू यांनी बूथ स्तरावर काम करण्याच्या सूचना दिल्या. ‘एसआयआर’ आणि ‘मन की बात’ यांसारखे उपक्रम व कार्यक्रम अत्यंत गांभीर्याने राबवून पक्षसंघटना प्रत्येक बूथपर्यंत अधिक मजबूत करण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 29-08-2026














