२० रिल्स स्टार्सचा सहभाग; फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांची विशेष उपस्थिती व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव
Ratnagiri Reels Competition 2026 चे आयोजन श्रीदेव एकमुखी दत्त मंदिर घुडेवठार, चवंडेवठार, पाटीलवाडी, विलणकरवाडी येथे करण्यात आले होते. या रत्नागिरी तालुका मर्यादित रिल्स स्पर्धेत एकूण २० रिल्स स्टार्सनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कलागुण सादर केले. स्पर्धेदरम्यान प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांची मुख्य उपस्थिती लाभली असून त्यांनी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करत प्रोत्साहित केले.
Ratnagiri Reels Competition 2026: विजेते आणि उपविजेत्यांची नावे जाहीर
स्पर्धेत सुतेज हरिश्चंद्र चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले, तर सौरभ बने हे उपविजेते ठरले. याशिवाय सुरज मस्कर आणि सम्यक मोहिते यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून आपल्या कौशल्याची छाप पाडली.
विशेष उल्लेखनीय बक्षीस आणि विविध गटांतील विजेते
स्पर्धेमध्ये कलाकारांच्या कल्पकतेला दाद देण्यासाठी विशेष उल्लेखनीय पारितोषिके प्रदान करण्यात आली:
- Highest View: चिन्मय साखरकर
- Highest Like: ओंकार खेडेकर
- Unique Creator: अमृत पेडणेकर
- Best Editor (लहान गट): शर्वील मुरकर, जिद्नेश शिंदे
- Best Editor (मोठा गट): ओंकार खेडेकर, समर्थ कीर, सुयश जाधव
स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सुप्रसिद्ध आयोजन आणि मार्गदर्शक
या तालुकास्तरीय रिल्स स्पर्धेचे नियोजन सुदेंधू बाबू घुडे, जय बोरकर, आदित्य शिरगावकर, निरंजन फाळके आणि मानस कीर यांनी यशस्वीपणे केले. या संपूर्ण सोहळ्यासाठी श्री दत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष मुन्ना चवंडे, उपाध्यक्ष सुमित नागवेकर तसेच विशाल मुंडये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 29-08-2026














