Drinking Alcohol in Public Khed: खांबतळेत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; एकावर गुन्हा दाखल

शाळेसमोरील मोकळ्या जागेत मद्यपान करणाऱ्यावर खेड पोलिसांची दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई

खेड, रत्नागिरी: खांबतळे येथील एल. टी. टी. शाळेसमोरील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात खेड पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास खांबतळे येथील एल. टी. टी. शाळेसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. शकील गफुर शेख (४०, रा. खांबतळे, खेड) हा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करताना आढळून आला. त्याच्याकडे मद्यपान करण्याचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये खेड पोलीस ठाण्यात १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई तेजस्विनी उमेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 03-09-2026