Bharne Naka Traffic Obstruction Khed: भरणे नाका येथे सार्वजनिक रस्त्यावर गाडी उभी करून वाहतुकीस अडथळा; खेड पोलिसांत गुन्हा दाखल

पुलाखालील रस्त्याच्या मध्यभागी वाहन सोडून पसार होणाऱ्या चालकावर कारवाई

Bharne Naka Traffic Obstruction Khed: खेड तालुक्यातील भरणे नाका, ब्रिजखालील परिसरात सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे करून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही घटना २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:४० वाजन्याच्या सुमारास भरणे नाका येथील पुलाखालील परिसरात घडली. संशयित आरोपी मनोज रवींद्र पांगत (रा. वेळू, समर्थविश्व अपार्टमेंट, ता. खेड) याने त्याच्या ताब्यातील ‘एमएच ०४ ईएफ ३९२७’ (MH 04 EF 3927) क्रमांकाची गाडी रस्त्याच्या मध्यभागी अशा अत्यंत निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने उभी केली होती.

गाडी रस्त्याच्या मधोमध सोडून चालक तेथून निघून गेल्यामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांच्या वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाला. तसेच सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत वाघ यांनी खेड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 04-09-2026