Sanjay Raut Interview Statement: तुरुंगातून सुटल्यावर पहिला फोन राहुल गांधींचा आला – संजय राऊत

राऊतांचे राष्ट्रीय राजकारण आणि तुरुंगातील दिवसांवर स्पष्ट भाष्य

मुंबई:

Sanjay Raut Interview Statement आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. पत्राचाळ प्रकरणात झालेल्या अटकेनंतर तुरुंगात घालवलेले दिवस आणि तिथल्या दाहक अनुभवांवर राऊत यांनी ‘दिनमान साहित्य उत्सवात’ ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मनमोकळे भाष्य केले. तुरुंगातून सुटल्यानंतर आपल्याला पहिला फोन उद्धव ठाकरे यांचा नाही, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आला होता, असा खुलासा राऊत यांनी या मुलाखतीदरम्यान केला.

“भारत जोडो यात्रेतून राहुल गांधींनी फोन करून धीर दिला”

Sanjay Raut Interview Statement आणि राहुल गांधींशी संवाद

आपल्या तुरुंगातील आठवणींना उजाळा देताना संजय राऊत म्हणाले की, “मी तुरुंगातून सुटल्यावर अनेकांचे फोन आले होते, पण प्रमुख राष्ट्रीय नेत्यांपैकी पहिला फोन राहुल गांधींचा होता. त्यावेळी त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ नांदेडमध्ये आली होती. त्यांनी मला फोन करून सांगितले की, ‘तुम्ही जे भोगले त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. तुम्ही झुकला नाही हे बरे झाले. आता लोकांना धीर येईल आणि कोणीही सत्ताधाऱ्यांना घाबरणार नाही.'”

राहुल गांधींच्या नेतृत्वावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपने राहुल गांधींची बदनामी करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले, परंतु आज राहुल गांधी हे देशातील ‘अनडिस्प्युटेड’ (निर्विवाद) नेते म्हणून समोर आले आहेत.

“मी बाळासाहेबांचा विश्वासू; सर्वसमावेशक राजकारण आवश्यक”

सर्वपक्षीय संबंध आणि राजकीय भूमिकेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “मी शिवसेनेचा नेता, खासदार आणि संपादक आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा अत्यंत विश्वासू माणूस आहे. माझी जेवढी श्रद्धा बाळासाहेबांवर आहे, तेवढी देवावरही नाही. परंतु, राष्ट्रीय राजकारण करताना स्वतःच्या पक्षाचा विचार घेऊन इतर पक्षांशी संवाद ठेवणे गरजेचे असते.”

सध्याच्या राजकीय वातावरणावर टीका करताना ते म्हणाले की, “विरोधात बोलणाऱ्यांना ‘दिमागी नक्षली’ ठरवणे ही घातक प्रवृत्ती आहे. नक्षलवादालाही एक विचार असतो. तुम्हाला गांधींवर गोळी झाडणारा चालतो, बिल्किस बानाच्या गुन्हेगारांना दिलेली प्रतिष्ठा चालते, मग ते ‘दिमागी नक्षली’ नाहीत का? तरुण मुले रस्त्यावर उतरून प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना नक्षली ठरवले जाते. देश पुढे न्यायचा असेल तर सर्वसमावेशक राजकारणच करावे लागेल, अन्यथा देशाची शकले होतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 05-09-2026