Sangameshwar Train Accident: संगमेश्वरमध्ये रेल्वे बोगद्यात ट्रेनच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

परचुरी-वेल्येवाडी येथील बोगदा क्रमांक १८२ मधील घटना; संगमेश्वर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

Sangameshwar Train Accident News मुळे कोकण रेल्वे मार्गावर खळबळ उडाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक बसून उत्तर प्रदेशातील एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पातीराम काशीराम भिटोरा (वय ३०, रा. झाशी, लुहारी, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही दुर्घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजण्यापूर्वी परचुरी-वेल्येवाडी येथील रेल्वे बोगदा क्रमांक १८२ मध्ये रेल्वे ट्रॅकवर घडली. रेल्वेची जोरदार धडक लागल्यामुळे पातीराम यांना गंभीर दुखापत झाली. तसेच शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच करुण अंत झाला.

Sangameshwar Train Accident News Police Investigation : संगमेश्वर पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती परचुरी गावचे पोलीस पाटील सुधीर सिताराम गुरव यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४४ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली. पोलिसांना मयत पातीराम यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर उताण्या अवस्थेत आढळून आला असून, त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात तुटलेल्या स्थितीत होता.

Mahrashi karve ANM

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३६/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. हा तरुण रेल्वे ट्रॅकवर कसा पोहोचला आणि अपघातामागील नेमकी परिस्थिती काय होती, याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 10-09-2026