अलोरे-शिरगाव पोलिसांची कुंभार्ली पुलावर मोठी कारवाई; सांगलीच्या ३ संशयितांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल
Chiplun Illegal Cattle Transport News मुळे चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कत्तलीच्या उद्देशाने प्राण्यांची अत्यंत निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर अलोरे-शिरगाव पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन बैलांसह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
ही घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५५ वाजण्याच्या सुमारास शिरगावहून अलोरेकडे जाणाऱ्या मार्गावर, कुंभार्ली गावाच्या अलीकडे असलेल्या नदीच्या पुलावर घडली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित बोलेरो पिकअप (एमएच ५० एन ५४७८) वाहनाची पाहणी केली असता, वाहनाच्या मागील बाजूच्या हौद्यात तीन बैल अत्यंत दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळून आले.
Chiplun Illegal Cattle Transport News Police Action : सांगलीच्या तिघांवर गुन्हा दाखल
गुरांना असह्य वेदना व यातना होतील अशा स्थितीत, कोणतीही वैध परवानगी न घेता कत्तलीसाठी किंवा विक्रीसाठी ही वाहतूक केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी अजय सुरेश साळुंखे (वय २७), आकाश प्रकाश साळुंखे (वय २९) आणि किरण सुरेश साळुंखे (वय २५) या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तिघेही मूळचे बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) येथील असून सध्या देवरूख येथे वास्तव्यास आहेत.
या कारवाईत ६५ हजार रुपये किमतीचे तीन बैल आणि ४ लाख रुपयांची बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे. अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ नुसार प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 10-09-2026















