Deepika Padukone 2nd Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंहला दुसरे कन्यारत्न!

Deepika Padukone 2nd Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंहला दुसरे कन्यारत्न!

१९ सप्टेंबरला दिला दुसऱ्या मुलीस जन्म; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिका-रणवीरने व्यक्त केला आनंद

दीपिका पादुकोण कन्यारत्न प्रकरण सध्या बॉलिवूडसह सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या घरी गणेशोत्सवाच्या काळातच दुसऱ्या चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. मुलगी ‘दुआ’च्या जन्मानंतर आता १९ सप्टेंबर रोजी दीपिकाने दुसऱ्यांदा एका कन्यारत्नाला जन्म दिला आहे. या बातमीनंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह जगभरातील चाहत्यांकडून या पॉवर कपलवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

दुसऱ्यांदा मुलगी झाल्यानंतर रणवीर आणि दीपिकाच्या आनंदाला उधाण आले आहे. दोघांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत सामायिक केली. या पोस्टमध्ये बाळाच्या पावलांचे लहानसे ठसे दाखवण्यात आले असून "स्वागत आहे, लेक, १९/९/२०२६, दुआ, दीपिका, रणवीर…", असा भावुक मजकूर लिहिण्यात आला आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

याआधी दीपिका आणि रणवीर यांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या पहिल्या अपत्याचे म्हणजेच ‘दुआ’चे जगात स्वागत केले होते. चाहत्यांनी आणि कलाकारांनी या चिमुकलीच्या आगमनावर आनंद व्यक्त केला आहे.

Shanti2

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका आणि रणवीर यांच्या या बातमीने सोशल मीडियावर ट्रेंड निर्माण केला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनीदेखील दीपिकाच्या या आनंदाच्या क्षणी तिला शुभेच्छा दिल्या असून, तिच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व समृद्धीची प्रार्थना केली आहे.