Horoscope Today 30 September 2026: आजचे सर्व १२ राशींचे राशीभविष्य!

Horoscope Today 26 September 2026: शनिवारचा दिवस १२ राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे संपूर्ण राशीभविष्य

पितृपक्षातील बुधवार आणि ग्रहांच्या दुर्लभ योगामुळे सर्व राशींवर होणार परिणाम; वाचा मेष ते मीन राशीचे विस्तृत राशीभविष्य

वैदिक पंचांगानुसार आज ३० सप्टेंबर २०२६, बुधवारचा दिवस अत्यंत विशेष आहे. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असून आजचा दिवस विघ्नहर्षा श्री गणेशाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल आणि निर्माण होणारा दुर्लभ संयोग सर्व १२ राशींच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणार आहे. श्री गणेश आणि विठुरायाच्या कृपेने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या आजचे राशीभविष्य:

सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today – 30 September 2026)

  • मेष रास (Aries): आज घरामधील एखाद्या फर्निचरची रचना बदलाल. यामुळे घरात एक वेगळेच प्रसन्न आणि मोकळे वातावरण राहील.
  • वृषभ रास (Taurus): आज घरात एखाद्या कौटुंबिक किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. तुमच्या बरोबरीचा व्यक्ती स्पर्धेत उतरल्यामुळे थोडी संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
  • मिथुन रास (Gemini): आज महत्त्वाचे निर्णय त्वरित घ्या. सकारात्मक भूमिका घेऊन आपल्या रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न करा.
  • कर्क रास (Cancer): आज महिलांना ऐशोआरामाचे जीवन जगण्याचा मोह होईल. मात्र आपल्या भावनांवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
  • सिंह रास (Leo): लेखकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांनी आपली मते लेखनामधून स्पष्टपणे मांडावीत, आज तुमच्या हातून उत्तम लिखाण होईल.
  • कन्या रास (Virgo): प्रेम प्रकरणात तरुणांना यश मिळण्याचे योग आहेत. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; आपण घेत असलेले औषध योग्य आहे की नाही, याची खात्री करून घ्या.
  • तूळ रास (Libra): कला क्षेत्रातील लोकांसाठी आज ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. तुमच्यातील धाडस आणि ज्ञान यांचा योग्य समतोल साधून तुम्ही यश मिळवाल.
  • वृश्चिक रास (Scorpio): आज हाती घेतलेल्या कामांमध्ये यश लाभेल. महिलांना कौटुंबिक पातळीवर दोन पिढ्यांमधील विचारांची तफावत स्पष्टपणे जाणवेल.
  • धनु रास (Sagittarius): आज तुमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेत नाही ना, याकडे विशेष लक्ष द्या. व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
  • मकर रास (Capricorn): आज घरात कोणाच्या तरी आजारपणावर धनखर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतल्यास बंध दृढ होतील.
  • कुंभ रास (Aquarius): आज घरात शांततेचे वातावरण राहील. व्यवहारात आणि दैनंदिन जीवनात नवनवीन गोष्टींचे थोडे जास्तच आकर्षण राहील.
  • मीन रास (Pisces): शांतता प्रिय स्वभाव आणि समजुतीचे वागणे यामुळे दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. काही प्रसंगी मध्यममार्ग किंवा सुवर्णमध्य काढावा लागेल.

टीप : वरील माहिती रत्नागिरी खबरदार माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:27 30-09-2026

Tata sierra