CJP Leaders Bail and Delhi Protest: करोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्त्यांसह नेत्यांना जामीन मंजूर; जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी पोहोचले नेते

CJP Leaders Bail and Delhi Protest: करोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि प्रवक्त्यांसह नेत्यांना जामीन मंजूर; जंतर-मंतरवर आंदोलनाची परवानगी मागण्यासाठी पोहोचले नेते

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार; सीजेपी नेत्यांची नवी घोषणा

CJP Leaders Bail and Delhi Protest: करोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके तसेच प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना काही अटी-शर्तींच्या आधारावर नुकताच जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळाल्यानंतर आज सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील पार्लमेंट पोलीस ठाण्यात हजेरी लावली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनाची परवानगी मिळावी, यासाठी हे नेते पोलिसांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले होते.

*"ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील"
*पोलिसांशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीने आक्रमक भूमिका कायम ठेवल्याचे स्पष्ट केले. सौरव दास म्हणाले की, "जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील. आंदोलन करणे हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. दिल्ली पोलीस क्रूरपणे वागत असून स्वतंत्र पत्रकार आणि वकिलांवर बेकायदेशीर कारवाई केली जात आहे."

सीजेपीने दिल्ली पोलिसांना २४ तासांची मुदत देत जंतर-मंतरवर आंदोलनासाठी तारीख आणि वेळ ठरवून परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अचानक जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगी मिळत नाही, यासाठी नियमानुसार १० दिवस आधी अर्ज करावा लागतो, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Swami swaru. Pat.

*मुंबईतील आंदोलनाप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेवर व मनसे नेत्यांवर गुन्हे
*दुसरीकडे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाचे लोण मुंबईतही पाहायला मिळाले. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

या प्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी ही कायदेशीर कारवाई केली आहे.