रत्नागिरी : जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर यांच्या मार्फत बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन 30 सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर (रानवी) येथे करण्यात आले आहे.
मेळाव्यात जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी आस्थापनांसह सहकारी संस्था यांना मेळाव्याकरीता रोजगार देणारे (employer) म्हणून निमंत्रित करण्यात येत आहे. उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरीता त्यांचे ५ बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी रत्नागिरी जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करावी.
नाव नोंदणी करणे कोणाला शक्य न झाल्यास त्यांनी सुध्दा मेळाव्यास उपस्थित रहावे. जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.पी.एस.शेटये प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गुहागर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 25/Sep/2024