Ratnagiri Public Drinking Case: तरवळ माचिवलेवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या वृद्धावर गुन्हा दाखल

Ratnagiri Public Drinking Case: तरवळ माचिवलेवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या वृद्धावर गुन्हा दाखल

ग्रामीण पोलिसांची कारवाई; विनापरवाना दारू पिणाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

रत्नागिरी : Ratnagiri Public Drinking Case संदर्भात रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या एका वृद्धाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

अनिल गंगाराम गोरीवले (वय ५८, रा. तरवळ मायंगडेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत महाडिक यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी संशयित अनिल गोरीवले हा तरवळ माचिवलेवाडी येथील एसटी स्टॉपच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अधिकृत दारू पिण्याचा परवाना (Permit) नसताना दारू पित असल्याचे निदर्शनास आले.

सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यसेवन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Smruddhi homes