Chiplun Water Scarcity: चिपळूण तालुक्यात ऑक्टोबरमध्येच टँकरची मागणी; आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट

Chiplun Water Scarcity: चिपळूण तालुक्यात ऑक्टोबरमध्येच टँकरची मागणी; आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट

धामणवणे आणि सावर्डे गावातून डिसेंबरपासून टँकरची मागणी; जुनी बिले थकल्याने ठेकेदार अडचणीत

दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून ग्रामपंचायतींकडून पाणीटंचाई निवारणासाठी टँकरची मागणी सुरू होत असते। मात्र, यंदा ऑक्टोबरअखेरीस चिपळूण तालुक्यातील धामणवणे आणि सावर्डे या दोन प्रमुख गावांनी आगामी डिसेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी Chiplun Water Scarcity चिपळूण पंचायत समितीकडे केली आहे। वेळेआधीच टँकरचे अर्ज दाखल झाल्याने शासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले असून, आगामी कडक उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अत्यंत तीव्र स्वरूप धारण करण्याची चिंता ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे।

गेल्या वर्षी १५ गावांतील ४५ वाड्यांना दिला होता टँकरद्वारे दिलासा

गतवर्षीच्या टंचाई काळात चिपळूण तालुक्यातील अनारी, डेरवण, अडरे, रेहेळ भगाडी, वैजी, पिंपळी, कोळकेवाडी, टेरव, सावर्डे, कोंडमळा, नांदिवसे, कादवड, आकले, नारदखेरकी, परशुराम आणि दहिवली बुद्रुक अशा १५ गावांमधील ४५ वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले होते। या टँकर पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाकडून सुमारे ७ लाख २४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला होता।

Amey jwelrs

५.६७ लाखांची थकीत बिले; नव्या टँकर पुरवठ्याबाबत अनिश्चितता

एकिकडे वेळेआधीच पाणीटंचाईची चाहूल लागलेली असताना, दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर जुनी बिले प्रलंबित राहिल्याने नवे संकट उभे ठाकले आहे। गेल्या वर्षी टँकर भाडे आणि डिझेल खर्चापोटी झालेल्या एकूण ७ लाख २४ हजार रुपयांच्या खर्चापैकी ठेकेदाराला आतापर्यंत केवळ १ लाख ५७ हजार रुपयेच मिळाले असून, उर्वरित ५ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम अद्याप शासनाकडून मिळालेली नाही।

थकीत रकमेमुळे टँकर पुरवठादार ठेकेदार तीव्र आर्थिक अडचणीत सापडले असून, चालू हंगामात नव्याने पाणीपुरवठा करण्यास ते उत्सुक नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठेकेदारांची बिले वेळेत न निघाल्यास प्रशासनाला टँकर कसे उपलब्ध होणार, असा गंभीर तिढा चिपळूण पंचायत समितीसमोर निर्माण झाला आहे।