संजीवन प्रतिष्ठानतर्फे ‘गड-किल्ल्यांचा जागर २०२६’; हरचेरी गणात भव्य दिवाळी किल्ले निर्मिती स्पर्धा!

संजीवन प्रतिष्ठानतर्फे 'गड-किल्ल्यांचा जागर २०२६'; हरचेरी गणात भव्य दिवाळी किल्ले निर्मिती स्पर्धा!

छत्रपती शिवरायांचा पराक्रमी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम; ८ नोव्हेंबरला होणार परीक्षण

रत्नागिरी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि स्वराज्याच्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा जपला जावा, या उद्देशाने संजीवन प्रतिष्ठानच्या वतीने ‘गड-किल्ल्यांचा जागर २०२६’ या भव्य दिवाळी किल्ले निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदा ८ वे वर्ष आहे. 🏰 स्पर्धेचे वयोगट :
🔹 गट १ (छोटे किल्लेदार) : ८ ते १५ वर्षे
🔹 गट २ (गडकोट मावळे) : खुला गट (सर्वांसाठी खुला) 🎯 स्पर्धेचा मुख्य उद्देश :
• लहान मुलांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देणे
• ऐतिहासिक गड-किल्ल्यांची माहिती व महत्त्व समजावून घेणे
• छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची ओळख करून देणे व वारसा जपणे 📍 स्पर्धेचे ठिकाण आणि परीक्षण :
• ठिकाण : प्रत्येक स्पर्धकाचे घर
• परीक्षण तारीख : ८ नोव्हेंबर २०२६
• कार्यक्षेत्र : ही स्पर्धा फक्त हरचेरी पंचायत समिती गण मर्यादित असेल 🚩 आयोजक :
संजीवन प्रतिष्ठान
संस्थापक अध्यक्ष : दादा दळी (तालुका अध्यक्ष – भाजप रत्नागिरी दक्षिण / सदस्य – पंचायत समिती रत्नागिरी) हरचेरी गणातील बालचमुंनी व शिवप्रेमींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Samarth gold