Sindhuratna Samruddha Yojana 2.0 Logo Competition : ‘सिंधुत्न समृद्ध योजना २.०’ साठी राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धा; आकर्षक रोख बक्षीसांची घोषणा

Sindhuratna Samruddha Yojana 2.0 Logo Competition : 'सिंधुत्न समृद्ध योजना २.०' साठी राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धा; आकर्षक रोख बक्षीसांची घोषणा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन; कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यास सक्त बंदी

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ‘सिंधुत्न समृद्ध योजना २.०’ ची स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याची वैशिष्ट्ये आणि योजनेची संकल्पना प्रभावीपणे मांडणारा लोगो तयार करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, कलाकार, ग्राफिक डिझायनर आणि कल्पक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

लोगो कशी असावी? (प्रमुख वैशिष्ट्ये आणि निकष)

Shitit jyotish

सर्जनशील संगम: प्रस्ताविता लोगोमध्ये अथांग अरबी समुद्र, सागरी संपदा, सह्याद्रीच्या रांगा, निसर्ग, हापूस आंबा, शेती-बागायती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, कोकणी संस्कृती, स्थानिक उद्योजकता, रोजगार आणि शाश्वत विकास अशा रत्नागिरीच्या वैशिष्ट्यांचा सर्जनशील संगम असणे अपेक्षित आहे.

प्रतिबंध व नियम: लोगो तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करण्यास सक्त बंदी असून एआयचा वापर किंवा नक्कल आढळल्यास प्रवेशिका थेट रद्द केली जाईल. तसेच राजकीय चिन्हे, व्यक्तींचे फोटो, धार्मिक किंवा आक्षेपार्ह बाबी तसेच शासनाच्या अधिकृत राजमुद्रेची नक्कल लोगोमध्ये करता येणार नाही.

स्वरूप: लोगो पूर्णपणे स्वयंचलित, रंगीत आणि सोशल मीडिया, संकेतस्थळ, पत्रव्यवहार, फलक व बॅनर अशा विविध माध्यमांवर लहान-मोठ्या आकारात वापरण्यायोग्य असावा.

बक्षीस व पारितोषिक तपशील

स्पर्धेतील सर्वोत्तम लोगोला १० हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

जिल्ह्याची ओळख, योजनांची संकल्पना आणि नावीन्यता या निकषांवर १०० गुणांच्या आधारावर तज्ज्ञ समिती मूल्याङ्कन करणार असून समितीचा निर्णय अंतिम असेल. निवडलेल्या लोगोचे सर्व कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा अधिकार ‘सिंधुत्न कार्यकारी समिती, रत्नागिरी’ यांच्याकडे राहतील.

प्रवेशिका पाठवण्याचा अंतिम दिनांक व पत्ता

अंतिम मुदत: ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

स्वरूप: लोगो JPG किंवा PNG स्वरूपात पाठवावा, शक्य असल्यास वेक्टर, CorelDRAW, EPS किंवा PDF फाईलही जोडावी. तसेच डिझाईनमागील संकल्पना स्पष्ट करणारी १०० ते १५० शब्दांची टीप जोडणे अनिवार्य आहे.

पाठवण्याचा पत्ता / ई-मेल: इच्छुकिकांनी dporatnagiri@gmail.com या ई-मेलवर किंवा जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, रत्नागिरी – ४१५ ६१२ या पत्त्यावर आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात.