Ratnagiri Post Office Parking Pothole: रत्नागिरी मुख्य पोस्ट ऑफिसच्या वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्याचा सांगावा; वाहनचालकांची कसरत

Ratnagiri Post Office Parking Pothole: रत्नागिरी मुख्य पोस्ट ऑफिसच्या वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्याचा सांगावा; वाहनचालकांची कसरत

वर्दळीच्या ठिकाणी खड्ड्यात अडकली महिंद्रा थार गाडी; प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी

रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोरील वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर पडलेला एक मोठा खड्डा वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. वाहनतळात प्रवेश करतानाच वाहनचालकांना या खड्ड्याचा सामना करावा लागत असल्याने कसरत करावी लागत आहे. नुकतीच एक महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडी या खड्ड्यात अडकल्याने वाहन बाहेर काढताना चालक आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या घटनेनंतरही खड्डा बुजवण्यात आलेला नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्य पोस्ट ऑफिस आणि त्यासमोरील वाहनतळ हे शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. पोस्ट ऑफिसमध्ये कामासाठी येणारे नागरिक, व्यापारी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची येथे सतत वर्दळ असते. मात्र, वाहनतळाच्या प्रवेशद्वारावरील या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना नाहक अडचण सहन करावी लागत आहे. थार गाडीचे चाक खड्ड्यात खोलवर अडकल्याने ती बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.

अपघाताची भीती आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वाहनतळात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना अचानक हा खड्डा समोर येत असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कमी प्रकाशामुळे हा खड्डा न दिसल्यास मोठा अपघात होण्याचीही दाट भीती वर्तवली जात आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणीच रस्त्याची आणि वाहनतळाची अशी दुर्दैवी अवस्था असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या व नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाने कुठल्याही मोठ्या अपघाताची वाट न पाहता तातडीने हा खड्डा बुवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Hotel star caters