Mandangad Car Accident: मंडणगडमध्ये कारच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी; पुण्याच्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Mandangad Car Accident: मंडणगडमध्ये कारच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी; पुण्याच्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुनवली येथील सांडेवाडी ते शेणळे सईणारा मार्गावरील घटना; भरधाव कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत तिघे गंभीर

मंडणगड: Mandangad Car Accident या दुर्घटनेत मंडणगड तालुक्यातील पुनवली येथील सांडेवाडी ते शेणळे सईणारा मार्गावर एका भरधाव कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला असून, या प्रकरणी कारचालक आशुतोष अशोक पंढरपूरकर (वय ४८, रा. कोथरूड, पुणे) याच्याविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यू नबीसाब मुल्ला (वय ५२, रा. पालेघर, मंडणगड) हे आपली मोटरसायकल (क्र. एमएच १२ एस ५२४७) घेऊन जात असताना, आरोपी आशुतोष पंढरपूरकर याने आपल्या ताब्यातील कार (क्र. एमएच ०८ बीसी ७३५७) भरधाव व निष्काळजीपणे चालवून या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार राज्यू मुल्ला यांच्यासह देवकुमार मेघेपाल खैरनार (वय २७, मध्य प्रदेश) आणि जैमुद्दीन अनू शेख (वय ४२, मुंबई) हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी मेहबूब नबीसाब मुल्ला (वय ४९, रा. पालेघर, मंडणगड) यांनी १२ नोव्हेंबर रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Shoping fiesta