रत्नागिरी खबरदारची नवीन सुपरफास्ट वेबसाईट कार्यान्वित

◼️ गुगल डिस्कव्हर मध्ये रँक होणारी कोकणातील एकमेव वेबसाईट

रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे सुपरफास्ट न्यूज नेटवर्क म्हणून ओळख असणारे रत्नागिरी खबरदार सातत्याने आपल्या प्रणालीत नवनवीन तंत्रज्ञान आणून बदल करीत असते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी खबरदार ने आपल्या वेबसाईट मध्ये आधुनिक तंत्रद्यान आणून वाचकांना अत्यंत वेगवान अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरी खबरदार ने आपली वेबसाईट आता क्लाउड सिस्टीम वर स्थापित केली आहे. यामुळे वाचकांना वेबसाईट वरील बातम्या वाचताना एक वेगळा वेगवान अनुभव मिळणार आहे.

रत्नागिरी खबरदारच्या वेबसाईटला लाखोच्या संखेने वाचक भेट देतात. त्यामुळे त्या क्षमतेची वेबसाईट आता तयार करण्यात करण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील एक नंबरची वेबसाईट म्हणून रत्नागिरी खबरदार ची ओळख आहे. कोकणातील दोन नंबर वर येणारी वेबसाईट रत्नागिरी खबरदारच्या तब्बल ३ लाख क्रमांकाने मागे आहे. हि क्रमवारी सिमिलर वेबच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

रत्नागिरी खबरदार ची वेबसाईट हि गुगल डिस्कव्हर वर रँक होणारी रत्नागिरीतील एकमेव वेबसाईट आहे.