मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची नुकतीच निवड झाली असून राज ठाकरे यांनी पत्राद्वारे नियुक्ती जाहीर केली आहे. या निवडीचे पत्र पक्षाचे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नलावडे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी संतोष नलावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचा सत्कार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 25/Sep/2024

Infigo Eyecare