रत्नागिरी : शासकीय योजनांचे कार्यालय असल्याचे भासवून बांधकाम कामगारांची फसवणूक

रत्नागिरी : शासनाच्या कार्यालयाचा भाग असल्याचे भासवून कामगारांकडून हजार ते दीड हजार उकळून फसवणूक करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ऑगस्ट २०२४ ते २४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शिवाजीनगर येथे घडली आहे. नरेंद्र करंजुसकर (रा. इस्लामपूर, वाळवा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे, त्याने ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत शिवाजीनगर येथील शिवरुदप्राईड इमारतीमध्ये स्वतःचे खासगी कार्यालय सुरू करून महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेसाठी कामगारांना शासनाच्या कार्यालयाचा भाग असल्याचे भासवले. त्यानंतर कामगारांकडून नोंदणी, नूतनीकरण, यासाठी १ रुपया फी असतानाही साधारणपणे १ हजार ते १ हजार ५०० रुपये देण्यासाठी प्रवृत्त करत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 26/Sep/2024