केदार साठे म्हणजे भाजप नाही : आमदार योगेश कदम

खेड : भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीची महायुती आहे. महायुतीच्या नेत्यांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी नक्की काय करायचं ते त्यांना कळेल, असा टोला आमदार योगेश कदम यांनी लगावला. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोलीचे उमेदवार म्हणून आम्ही कदम यांना स्वीकारणार नाही, असे म्हटले होते. याबाबत आमदार योगेश कदम म्हणाले, “याच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी मागील निवडणुकीतही माझ्या विरोधात काम केले होते. मग साठे नक्की कुणाला मतदान करणार, केवळ युतीमध्ये खोडा घालण्याचे काम जिल्हाध्यक्ष साठे यांच्याकडून सुरू आहे; परंतु भाजपचा खरा कार्यकर्ता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे २०१९ प्रमाणे या वेळच्या निवडणुकीतही मी दापोली विधानसभा मतदार संघावर झेंडा फडकवेन.” दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या दौऱ्यात भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत कदम म्हणाले, “अलीकडे भास्कर जाधव शांत आहेत. समझनेवाले को इशारा काफी है.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 26/Sep/2024