खेड येथील तरुणाचा रात्री झोपेत मृत्यू

खेड : खेड येथील तरुणाचा रात्री झोपेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार, मयत शुभम प्रवीण कदम वय २३, राहणार महाड नाका, खेड यास मागील चार ते पाच दिवसांपासून खोकल्याचा त्रास होता. परंतु यावर उपाय करण्यासाठी त्याने डॉक्टर कडे न जाता त्याने मेडिकल स्टोअर्स मधून खोकल्याचे सिरप आणले होते. २४ सप्टेंबर रोजी शुभम हा जेवण झाल्यावर आपल्या राहत्या घरी झोपण्यासाठी गेला होता. रात्री अडीचच्या सुमारास शुभम कोणतीच हालचाल करीत नसल्याचे घरच्याना लक्षात आले. त्याला उठवण्याचा देखील प्रयत्न केला असता त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून शुमम ला डॉ. मुल्ला यांच्या यांच्या हॉस्पिटल ला नेण्यात आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 26-09-2024