‘बँडी ऑफ आईस’ हॉकीमध्ये खेडच्या रुद्राक्षने कोरले रौप्यपदकावर नाव

खेड : नोव्हेंबरमध्ये श्रीरंगम जिल्हा तामिळनाडू येथे झालेल्या नॅशनल बँडी स्पर्धा झाली. यामध्ये रोटरी स्कूलचा विद्यार्थी रुद्राक्ष मोरे याने रौप्य पदक प्राप्त करून विजय संपादन केला आहे. बँडी हा खेळ आईस कोर्टवर खेळला जातो. परंतु, देशातील बऱ्याच राज्यात बर्फ नसल्याने तो शासनाने ‘ऑफ आईस’वर खेळण्यास परवानगी दिली. यामुळे आपल्याकडे राज्य अथवा नॅशनल ऑफ आईस खेळले जाते. तसेच हा खेळ गुडगाव दिल्ली येथे तसेच गुलमर्ग जम्मू-काश्मीर येथे खेलो इंडिया खेलो असे खेळ होतात. हा खेळ विंटर ऑलिम्पिकमधील आहे. रुद्राक्ष मनीषा रवींद्र मोरे याने श्रीरंगम जिल्हा तिर्ची तामिळनाडू येथे झालेल्या नॅशनल बँडी स्पर्धेत १६ वर्षांवरील महाराष्ट्र संघातून खेळताना गुजरातच्या संघाविरुद्ध द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

रुद्राक्षच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. रुद्राक्षने प्राप्त केलेल्या या यशामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्राक्ष याला शाळेतील सर्व क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रुद्राक्ष मोरे याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 03/Dec/2024

Tata sierra